शोएबकडून आयेशाला तलाक

April 7, 2010 9:19 AM0 commentsViews: 1

7 एप्रिलअखेर पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा यांच्या निकाहचा मार्ग मोकळा झाला आहे. शोएब मलिक आणि आयेशा सिद्दिकी यांच्यात तडजोड झाली आहे. शोएबने आयेशासोबत लग्न झाल्याचे मान्य केले आहे. आणि यासोबतच शोएबने आयेशाला आज सकाळी रितसर तलाकही दिला. याशिवाय लग्नात मिळालेला मेहेरही शोएबने परत केला. तडजोडीनुसार पुढील तीन महिने प्रत्येक महिन्याला शोएबकडून आयेशाला 5 हजार रुपयांची पोटगी देण्यात येणार आहे. शोएबविरुद्ध दाखल केलेला एफआयआरही ही सिद्दीकी कुटुंबीयांनी माघारी घेतला आहे. दोन्ही कुटुंबीयांदरम्यान तडजोड झाल्याचे आयेशाच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

close