कोल्हा’पूर’मय,एनडीआरएफच्या टीम दाखल

July 13, 2016 3:20 PM0 commentsViews:

कोल्हापूर- 13 जुलै : कोल्हापुरात पावसाचा जोर कायम असून पूरस्थिती निर्माण झालीये. पूरस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफच्या टीम 10 बोटींसह कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत 800 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. आता पाऊस कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.kol_rain

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नृसिंहवाडीचं दत्तमंदीर पाण्याखाली गेलंय. पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी 44 फुटांपर्यंत वाढलीये. शिरोळ तालुक्याला पुराच्या पाण्याचा फटका बसण्याची भीती आहे. शिरोळमधील अनेक घरांची पुराच्या पाण्यात पडझड झाली आहे.

तर धरणाच्या पाणलोट शेत्रात पावसाचा जोर चागला असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. राधानगरी धरण अवघ्या काही दिवसात 71 टक्के भरलं आहे. 1 जूनला राधानगरी धरणात फक्तअर्धा टीएमसी पाणी शिल्लक होतं पण आता हे धरण 71 टक्के भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर असाच चालू राहिला तर धरण पूर्ण क्षमतेनं भरेल आणि धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडतील असं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये ज्यांचं नुकसान झालंय त्यांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल असं मदत पूर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा