मागील वर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णात दुप्पटीने वाढ

July 13, 2016 6:01 PM0 commentsViews:

13 जुलै : राज्यात वाढत्या डेंग्यूच्या रूग्णांमुळे चिंतेच वातावरण पसरलंय. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूच्या रूग्णांत दुप्पटीने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2015 च्या जानेवारी ते मे महिन्यापर्यंत 355 रूग्ण डेंग्यूचे आढळले होते. यावर्षी हा आकडा दुप्पटीने वाढत 769 वर पोहचलाय.dengu_nagpur

दुसरीकडे चिकन गुनिया सारख्या आजारानेही तोंडवर काढलंय. डेंग्यूच्या डासांचा उत्पत्तीचा काळ हा खर्‍याअर्थाने जून ते नोव्हेंबर असतो. याच काळात डेग्यूच्या रूग्णात वाढ होत असते. माञ राज्यात डेंग्यू बाबत योग्य त्या उपाययोजना सरकार कडून न केल्याने राज्यांसमोर डेंग्यूचं संकट उभं राहिलंय. मागील वर्षी म्हणजेच 2015 आणि 2016 मधील जानेवारी ते मे महिन्यापर्यंतच्या डेंग्यूच्या रूग्णांच्या आकडेवारी समोर आलीये.

जिल्हा         2015          2016

कोल्हापूर      11          87
सांगली         3           40
नाशिक        16          30
धुळे              5          29
पुणे             10          25
सातारा          1          16
सोलापूर         7          15
सिंधुदुर्ग        0           20
रत्नागिरी      11          18
ठाणे             3          20

महापालिका क्षेञातील डेंग्यूच्या रूग्णाची आकडेवारी

महापालिका             2015 2016

नाशिक –               12 –         74
पिंपरी चिंचवड –     8 –         54
सोलापूर –              3 –         37
कोल्हापूर –            2 –          23
भिवंडी –                 5 –         11
सांगली –                0 –         9
नांदेड –                   0 –         8
ठाणे –                     7 –         47
मुंबई –                   133 –     106
नवी मुंबई –               5 –         1 (खाजगी रूग्णालयांसह)

एक डास एका वेळेस 100 ते 250 अंडी देतात. या अंड्यामधून 7 ते 10 दिवसांत डासांची उत्पत्ती होते. डासांचा हा जिवनचक्र जर मोडीत काढलं नाही. तर राज्यातील मागिल वर्षांच्या 56 हजार 603 मलेरियाच्या रूग्णांची संख्या दुप्पटीने म्हणजेच एक लाखांवर पोहचू शकते अशी भीती व्यक्त केली जातेय.

डेंग्यू बरोबरच चिकन गुनिया या आजाराने देखील डोकवर काढलंय. या चिकन गुनियाचा सर्वांधिक फटका पिंपरी चिंचवड, पुणे, सातारा, औरंगाबाद या शहरांना बसला.

सुरूवातीच्या काळात आपल्या शहरात चिकन गुनिया या आजाराचा प्रसार होतोय यांची माहिती देखील या महापालिकांच्या आरोग्य विभागाला नव्हती म्हणूनच पिंपरी चिंचवड सारख्या महापालिका क्षेञात देखील हा आजार झपाट्याने फोफावला.

आता नवी मुंबई महापालिकेप्रमाणेच राज्यभरात डासांची उत्पत्ती नष्ट करण्यासाठी तात्काळ आठवडी प्रोग्राम सक्तीने राबवणं गरजेच आहे. तसंच गावपातळीवर.. घरांघरामध्ये डास उत्पत्तीची शोध मोहीम घेणं गरजेच आहे. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण देणं गरजेच आहे. पण खरंच राज्याचा आरोग्य विभाग तेवढ्याच तत्परतेने हे करेल का.. हाच खरा प्रश्न आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा