औरंगाबादमध्ये प्रचाराचा धुराळा

April 7, 2010 9:28 AM0 commentsViews: 1

7 एप्रिलऔरंगाबादमध्ये आज सर्वच प्रमुख पक्षांमधील नेत्यांच्या सभा होत आहेत. सकाळीच शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांचा शहरातून रोड शो पार पडला. रोड शोमध्ये नीलम गोरे, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवेसनेचे नेते सहभागी झाले. क्रांती चौकातून या रोड शोची सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख वॉर्डामधून शिवसैनिकांसह हा रोड शो काढण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी सर्वच नेते हजेरी लावत आहेत.राज ठाकरेंची सभामनसे अध्यक्ष राज ठाकरे सहा वाजता टीव्ही सेंटर हडको येथील मैदानावर सभा घेत आहेत. तर मनसेचे गोल्डमॅन आमदार रमेश वांजळे यांनी रोड शो करून प्रचाराला वेग आणला आहे. या प्रचाराकरिता मनसेचे बरेच नेते औरंगाबादमध्ये मुक्काम ठोकून आहेत. दर्डा यांच्या पदयात्राकाँग्रेसच्या प्रचारासाठी उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांनीही शहरातील वॉर्डामध्ये पदयात्रांचा धडाका लावला आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांनी मतदारांच्या थेट भेटी घेत शहर पिंजून काढले आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी औरंगाबादमध्ये महिमा चौधरीनेही हजेरी लावली. सिडको भागामध्ये उमेदवारांसह रोड शो करण्यात आला. महिमा चौधरीच्या या रोड शोला मोठा प्रतिसाद मिळाला.सिडकोतील प्रमुख वॉर्डामध्ये महिमा चौधरीने मतदारांच्या भेटी घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराना विजयी करण्याचे आवाहन केले. मुंडेंच्या सभाभाजप नेते गोपीनाथ मुंडेही प्रचारासाठी सभा घेत आहेत. स्मृती इराणी यांनी रोड शो करुन प्रचारात भाग घेतला. शहरातील 99 वॉर्डांसाठी 11 एप्रिलला मतदान होत आहे.

close