एक्सक्लुझिव्ह : अशी असेल मुंबईची भुयारी मेट्रो-3 !

July 13, 2016 8:40 PM0 commentsViews:

13 जुलै : मुंबईची लाईफलाईन अर्थात मुंबईची लोकल…आता या लाईफलाईनला मेट्रोची जोड लाभली आहे. लवकरच मुंबईकरांच्या सेवेत भुयारी मेट्रो दाखल होणार आहे. मुंबईतली पहिली भुयारी मेट्रो म्हणजेच मेट्रो तीन…या भुयारी मेट्रोचा कुलाबा बांद्रा ते सिप्झ मार्ग असणार आहे.

33.5 किमी च्या मेट्रो तीनच्या मार्गात एकूण 27 स्टेशनचा समावेश असेल. हे स्टेशन 2 मजली असणार आहे. 27 स्टेशन्सपैकी 1 स्टेशन हे जमिनीवर असेल पण बाकी सगळी स्टेशन्स ही जमिनीच्या आत असतील. खालचा मजल्यावरुन ट्रेन जाईल आणि वरच्या मजल्यावर कॅफटेरिया, तिकिट काउंटर असेल. काही दिवसापुर्वीच 7 वेगवेगळे टेंडर काढण्यात आले. जे 18 हजार 115 कोटींचे आहे.

metro_3मेट्रोचं भुयारी काम सुरू असताना वरुन ट्रॅफिक सुरू राहु शकतं. एका वर्तुळाकार मशिनचा भुयार खोदण्यासाठी वापर केला जाणार आहे. आणि याचवेळी भुयार सुरक्षित होईल अशी यंत्रणा असल्यानं जमीन खचणार नसल्याची खात्रीही एमएमआरसीएल देतंय. 2021 पर्यंत मेट्रो सुरू करण्याच्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा प्रयत्न आहे. एकूण 35 ट्रेन पहिल्या टप्प्यात आणल्या जातील. या मेट्रो 6 डब्याच्या असतील. दर 6 ते 8 मिनिटाला एक ट्रेन धावेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा