उस्मानाबादकडे पावसाने फिरवली पाठ, धरणं अजूनही कोरडीठाक

July 14, 2016 2:18 PM0 commentsViews:

उस्मानाबाद, 14 जुलै : राज्यात जोरदार पाऊस बरसत असताना उस्मानाबाद जिल्ह्याकडं पावसानं पाठ फिरवलीये. आत्तापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या अवघ्या 21 टक्के एवढाच पाऊस पडलाय. आतापर्यंत फक्त 172 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालीये. जिल्ह्यातल्या मांजरा, सिनेकोळेगाव, तेरणा, माखनी चांदणी ही धरणं कोरडीठाक पडली आहे. तर इतर छोट्या धरणांमध्ये अवघा एक टक्के पाणीसाठा आहे.osmanabad

राज्यात पावसाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे मात्र पावसाच्या प्रतीक्षेत असणार्‍या दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्यात मात्र पावसाने आणखी म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. जुलै महिना अर्धा संपत आला तरी जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 172 मिलिमीटर म्हणजेच केवळ 21 टक्के एवढाच पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील मांजरा, सिनकोळेगाव ,तेरणा,माखनी, चांदणी ही प्रमुख धरणे आज घडीला कोरडी ठाक आहेत तर उर्वरित 217 लघू आणि मध्यम प्रकल्पामध्ये केवळ 1 टक्के पाणीसाठा साठलाय. एकीकडे उर्वरित महाराष्ट्रमध्ये नद्या तुडुंब वाहतायत तर धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यातील धरणात पाण्याचा एक थेंब नाही. उर्वरित महाराष्ट्रात जसा बरसतोय तसा उस्मानाबादमध्येही बरस अशी प्रार्थना उस्मानाबादमधली जनता करतेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा