अखेर राम शिंदेंनी स्वीकारला पदभार

July 14, 2016 9:08 PM0 commentsViews:

24 जुलै : अखेर राम शिंदे यांनी जलसंधारण खात्याचा पदभार स्वीकारलाय. कुठल्याही वादात पडायचं नव्हतं म्हणून मुंबईपासून दूर होतो असं स्पष्टीकरण राम शिंदेंनी केलंय.RAMSHINDE

मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना चांगलाच धक्का दिला. पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण खाते काढून घेण्यात आलं. त्यांचं हे खातं राम शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आलं. पण, गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे राजकारणात मोठे झालेले राम शिंदे त्यांच्या कन्या पंकजा मुंडेंची नाराजी ओढावून घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी पदभार काही स्वीकारला नाही. अखेर आज आठवड्याभरानंतर त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर आपल्याला पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्र्यांच्या वादात पडायचं नाही असा खुलासा करत हात झटकले आहे. पण, याचाच दुसरा अर्थ असाही होतो की, राम शिंदे यांच्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात वाद झालेला होता. हा वाद मिटलाय का ?, काय बोलणं झालं याची माहिती राम शिंदेंनी दिलेली नाही. पण पंकजा यांच्याशी बोललल्यानंतरच राम शिंदेंनी पदभार स्वीकारल्याचं स्पष्ट झालंय. जलसंधारण खातं काढून घेतल्यामुळे पंकजा मुंडे नाराज होत्या. ओबीसी नेत्यांमध्ये फूट पाडण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ही खेळी खेळल्याची चर्चा आहे. कारण राम शिंदे हे धनगर समाजाचे नेते आहेत. राम शिंदेंनी पदभार स्वीकारायला टाळाटाळ केल्यानं मुख्यमंत्र्यांचीही गोची झालेली. अखेर पंकजाशी बोलल्यानंतरच राम शिंदेंनी पदभार स्वीकारलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा