अस्थमा वाढतो आहे…

April 7, 2010 10:30 AM0 commentsViews: 16

शची मराठे, मुंबई 7 एप्रिलमुंबई…अनेकांना रोजी रोटी मिळवून देणारे शहर अशी या शहराची ओळख. मात्र या शहरातील वेगवान आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अस्थमा या आजाराचा प्रसार वाढतो आहे. आज जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने मुंबईकरांच्या या समस्येचा आढावा घेणे गरजेचे आहे.धूळ, ऍलर्जी, अनुवांशिकतेसोबतच आता वाढते शहरीकरण आणि त्यामुळे बदललेली लाईफस्टाईल ही अस्थमा होण्यास काणीभूत ठरत आहेत. स्त्रियांमध्ये अनुवंशिकतेने अस्थम्याचे प्रमाण काही टक्कांनी जास्त असते. त्याचे प्रमाण आता वाढत आहे. त्याचे कारण म्हणजे बदललेली लाईफस्टाईल. घरांमधील इनडोअर पोल्युशन म्हणजे उदाहणार्थ मच्छर भगानेवाली रासायनिक उपकरणे, यांमुळेही अस्थमा वाढत आहे.शिवाय मुंबइच्या दमट हवामानमुळे इथे अस्थमाचा त्रास हा इतर प्रदेशांपेक्षा जास्त जाणवतो.इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधनानुसार भारतात दोन ते अडीच कोटी लोक अस्थम्याचे पेशंट आहेत. मुंबई- पुण्यासारख्या मोठ्या शहरात अस्थमा रुग्णांचे प्रमाण आहे. जवळपास 10 लाखांच्याही वर ही रुग्णसंख्या जाते. दिल्ली देश का दिल है असे म्हटले जाते. तर मुंबईला देशाचा श्वास म्हटले जाते. पण आता मुंबईकरांचा श्वास कोंडू लागला आहे. त्यासाठी काळजी घ्यायला हवी…

close