प्रतीपंढरपूर वडाळ्यात भाविकांची गर्दी

July 15, 2016 11:22 AM0 commentsViews:

15 जुलै : प्रतीपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या मुंबईतील वडाळ्यातील विठ्ठल मंदिरातही भाविकांनी काल रात्रीपासूनच मोठी गर्दी केलीये.विठुरायाच्या दर्शनासाठी मुंबईतल्या निरनिराळ्या भागातले भाविक वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात आले आहे. मंदिराच्या आवारात विठुनामाचा गजर घुमू लागलाय.wadala

कामानिमित्त पंढरपूरला जाऊ शकलो नसलो तरीही प्रतीपंढरपुरातील विठुरायाच्या चरणी माथा टेकवून आपली सेवा रूजू करण्याचा भाविकांचा प्रयत्न आहे. सकाळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. एरवी हा मान मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना मिळत असला तरिही यंदा मंदिर समितीने खास शेलार यांना हा मान देऊ केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा