फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला, ट्रकने 84 जणांना चिरडले

July 15, 2016 12:43 PM0 commentsViews:

france15 जुलै : फ्रान्समध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झालाय. यात 84 जणांचा मृत्यू झाला तर 120 पेक्षा जास्त जण जखमी आहेत. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. फ्रान्सच्या नीस शहरात एका महोत्सवादरम्यान दहशतवाद्याने ट्रक गर्दीत घुसला. ट्रक चालकानं लोकांवर गोळीबार केल्याचंही वृत्त आहे. पोलिसांनी गोळीबारात ट्रक चालकाला ठार मारलं.

25 टनांचा हा ट्रक जवळपास 2 किलोमीटर अंतर लोकांना चिरडत गेला. ट्रकमध्ये शस्त्रास्त्रही सापडली आहेत. दहशतवादी नीस शहराचाच रहिवासी होता, आणि त्याचा परिवार मूळचा त्युनिसियाचा आहे. या हल्ल्याची जबाबदारी अजून तरी कुणी स्वीकारली नाहीय. फ्रान्समध्ये याआधी 2015 मध्येही पॅरिसवर हल्ला झाला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close