देव तारी त्याला…

April 7, 2010 11:14 AM0 commentsViews: 2

अजित मांढरे7 एप्रिलठाण्यातील शहापूरमध्ये एक चमत्कार घडला आहे. ट्रेकिंगसाठी गेलेला एक 17 वर्षांचा मुलगा 500 फूट खोल दरीत पडूनही सुखरूप बचावला आहे. अमर बोबडे असे त्याचे नाव असून त्याच्यावर सध्या ऐरोलीच्या इंद्रावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.मुंबईपासून जवळजवळ सव्वाशे किलोमीटरवरील शहापूरमधील माहोली गडावर अमर मित्रांसह ट्रेकिंगसाठी गेला होता. पण ट्रेकिंग झाल्यानंतर गडावरून खाली उतरताना अचानक अमर गायब झाला. त्याच्या मित्रांनी त्याचा खूप शोध घेतला पण त्यांना तो सापडला नाही. कारण शॉर्टकटने खाली उतरताना अमरचा तोल जावून तो 500 फूट खाली दरीत पडला होता. मित्रांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलीस आणि गावकर्‍यांनी मिळून अमरचा शोध घेतला. आणि अमर सापडला…खोल दरीत अमर 16 तास बेशुद्ध अवस्थेत पडून होता. त्यामुळे त्याच्या शरीरातील शुगर कमी झाली होती. पण डॉक्टर, पोलीस आणि गावकर्‍यांनी त्याला वेळेत हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि अमर मृत्यूच्या दाढेतून परत आला…

close