राष्ट्रपतींच्या ताफ्यातील गाडी दरीत कोसळली, जीवितहानी नाही

July 15, 2016 2:36 PM0 commentsViews:

darjaling3दार्जिलिंग, 15 जुलै : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ताफ्यातल्या एका गाडीला आज दार्जिलिंगजवळ अपघात झाला. ताफ्यातील एक गाडी दरीत कोसळली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा ताफा बागडोगरा विमानतळाकडे जात असताना डोंगराळ रस्त्यावरून एक गाडी रस्त्यावरून घसरली, आणि दरीत कोसळली. सुदैवानं गाडीतल्या सर्व पाच जणांना लगेच बाहेर काढण्यात आलं, आणि तिथेच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

राष्ट्रपतींबरोबर सतत एक मेडिकल टीम असते, त्यामुळे हे उपचार करता आले. राष्ट्रपती आणि त्यांच्या बरोबर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी दोघंही सुखरुप आहेत. पंतप्रधान मोदींनी फोन करून राष्ट्रपतींशी बातचीतही केली. राष्ट्रपती गाडीत असताना एकाच ठिकाणी इतका वेळ अडकून पडण्याची ही पहिलीच वेळ असावी.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा