अखेर हार्दिक पटेलांची जेलमधून सुटका, मात्र सहा महिन्यांसाठी ‘गुजरात बंदी’

July 15, 2016 3:02 PM0 commentsViews:

15 जुलै : 9 महिने जेलमध्ये काढल्यावर अखेर पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांची जेलमधून सुटका झालीये. पटेल आंदोलनादरम्यान हार्दिक यांना अटक झाली होती, आणि तेव्हापासून ते सूरतजवळच्या लाजपोर जेलमध्ये होते.

hardik_patelगुजरातमध्ये पटेल आरक्षणासाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला अभुतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता. या आंदोलनादरम्यान पोलिसांची परवानगी न घेता एकता यात्रा काढली होती. त्यामुळे हार्दिक पटेल यांना अटक करण्यात आली होती.

9 महिने जेलमध्ये राहिल्यानंतर हार्दिक पटेल यांची अखेर सुटका झालीये. पण, हार्दिक पटेल यांना 6 महिने गुजरातच्या बाहेर रहावं लागणार आहे. त्यासाठी पटेल गुजरातबाहेर रवानाही झाले. जेलमधून बाहेर आल्या आल्या पटेल यांनी पुन्हा एकदा मोदी सरकर आणि भाजपवर सडकून टीका केली. आंदोलन करणं हा कोणत्या पक्षाचा मालकी हक्क नाहीय. मला 56 इंचांची छाती नकोय, तर माझ्या समुदायाच्या  लोकांसाठी हक्क हवेत, अशी टीका हार्दिक पटेल यांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा