ऑपरेशन ‘संकटमोचन’ फत्ते, 300 भारतीय मायदेशी परतले

July 15, 2016 5:01 PM0 commentsViews:

 sankatmochan

15 जुलै : अंतर्गत यादवीग्रस्त दक्षिण सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यात केंद्र सरकारला यश आलंय. दक्षिण सुदानमधून 300 भारतीयांना घेऊन हवाई दलाची विमानं भारतामध्ये उतरली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 22 जणांचा समावेश होता.

या मोहिमेला ऑपरेशन संकट मोचन मोहीम असं नाव देण्यात आलंय. दक्षिण सुदानमध्ये हिंसाचार सुरू झाल्यामुळे भारतीय नागरिक तिथं अडकून पडले होते. त्यांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयानं ही मोहीम हाती घेतलीये. परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह हे देखील या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा