बंडखोरांवर कारवाई होईल

April 7, 2010 11:23 AM0 commentsViews: 5

7 एप्रिलबंडखोरांवर कारवाईच्या निर्णयावर पक्ष ठाम आहे. पक्षाचा आदेश न मानणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिला आहे.नंदुरबारला काँग्रेसच्या जिल्हा मेळाव्यासाठी आले असताना माणिकरावांनी हा इशारा दिला. पक्षाचा व्हीप झुगारून निवडणुकीत बंडखोरी करणार्‍यांना राजीनामा देण्याच्या नोटीसा पक्षाने काढल्या आहेत. पण अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखेपाटील यांनी मात्र अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे.

close