शब्द मुके झाले…अश्रू बोलू लागले…

July 15, 2016 5:21 PM0 commentsViews:

पुणे 15 जुलै : माणूस हा भावनांनी ओतप्रोत भरलेला प्राणी..,ह्या भावनांमधलीच एक भावना म्हणजे राग… हा राग अनावर झाला की त्याच्या हातून गुन्हा घडतो आणि मग त्याची शिक्षा भोगण्यासाठी जेलच्या अजस्त्र भिंतीच्या आतलं आयुष्य सुरू होतं.. मुलाखत कक्षाच्या जाळीतून एकमेकांशी बोलत बोलतच वर्षांमागून वर्ष उलटायला लागतात.yervada3

स्वतःची मुलं वाढताना दिसत असली तरीही त्यांना कधीही उराशी कवटाळता येत नाही. अशाच कैद्यांना वर्षांतून एकदा कुटुंबीयांना समोरासमोर भेटण्याची संधी कारागृह प्रशासनाने मिळवून दिलीय. आज पहिल्यांदाच पुण्यातील येरवडा कारागृहात हा प्रयोग पार पडला.अशावेळी शब्द मुके झाले आणि अश्रु बोलू लागले. भावनेनं ममतेनं ओतप्रोत भरलेल्या या दृष्याने तुमचेही डोळे पाणावल्या शिवाय राहणार नाहीत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा