लोकलच्या दारात अनिल कपूरची ‘हिरो’गिरी, रेल्वेनं बजावली नोटीस

July 15, 2016 7:29 PM0 commentsViews:

15 जुलै : लोकल प्रवासात होणारे अपघात रोखण्यासाठी ‘धावत्या लोकलमध्ये चढू नका’, लोकल प्रवासाबाबत रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सुचना दिल्या जातात. नियम मोडू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. पण अभिनेते अनिल कपूर यांनी लोकल प्रवासात नियम पायदळी तुटवल्याचं समोर आलंय. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाने अनिल कपूर यांना नोटीस बजावलीय.anil_kapoor

अनिल कपूर यांच्या ‘सीरीयल 24′ च्या दुसर्‍या भागाला लवकरच सुरूवात होणार आहे. या सिरियलच्या प्रमोशनसाठी अनिल कपूर यांनी रेल्वेत प्रवास केला होता. या प्रवासदरम्यान अनिल कपूर यांनी लोकलच्या दरवाज्यातून बाहेर झुकून शूट केल्याचं उघडझालंय. त्यामुळे लोकलमध्ये स्टंटबाजी केल्याचा ठपका ठेवत पश्चिम रेल्वेनं अनिल कपूरला नोटीस बजावली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा