‘महिला बालकल्याण’च्या कृपेनं ठेकेदार तुपाशी ; बचतगट उपाशी !

July 15, 2016 7:50 PM0 commentsViews:

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई -15 जुलै : घरपोच पोषण आहार पुरवठयात तीन ठेकेदार संस्थांचे ठेके 2013 मध्ये संपले. असं असतानाही राज्य सरकार आणि महिला बालकल्याण विभागाकडून याचं ठेकेदारांना मुदतवाढ देण्यात आलीय. राज्यात 314 बचतगट आहार पुरवठा करण्यास सक्षम झाले आहेत. त्यांचा पुरवठा सुरू आहे. नियमानुसार ठेकेदारांचं हे काम काढून बचतगटांना विभागून देणं गरजेच आहे. पण ठेकेदार संस्थांच्या काम काढून घेण्याची हिंमत ना महिला बालकल्याण विभागाने दाखवली..ना सरकारने दाखवली..याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट..

कुपोषित बालकं आणि गर्भवती मातांसाठीचा घरपोच पोषण आहार पुरवला जातो. राज्यात 2012 पूर्वी राज्यात संपूर्ण ठेके हे तीन
संस्थांना देण्यात आले.

2012 मध्ये यांना देण्यात आले ठेके
महाराष्ट्र महिला सहकारी गृहउद्योग संस्था मर्यादित धुळे
महालक्ष्मी महिला गृहउद्योग आणि बालविकास बहुद्देशीय संस्था नांदेड
व्यंकटेश्वरा औद्योगिक उत्पादन संस्था, लातूर

pankaja_munde_thrसर्वोच्च न्यायालयाने आपलेच तत्कालीन कमिशनर एन. सी सक्सेना आणि हर्षमंदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने नोव्हेंबर 2012मध्ये आपला अहवाल दिला. या अहवालात वरील 3 संस्थांवर आक्षेप घेत यांची मक्तेदारी झाल्याचं नमूद केलं. त्यावर या समितीनं ओरीसा आणि केरळ राज्याच्या धर्तीवर ठेक्यांचं विकेंद्रीकरण करण्याच्या सुचना केल्या. या आधारावर राज्यात 553 ब्लाक केले, जिल्हानिहाय टेंडर काढण्याचेे अधिकार कलेक्टर ला दिले.

20013 ला या तीन सस्थांचे पुरवठ्याची मुदत संपली. कुपोषित मुलांच्या आहारात खंड पडू नये, तसंच कमीत कमी वर्षातून 300 दिवस आहार देण्यात यावा या सर्वोच्च न्यायालयाच्या मुद्यावर याचं संस्थांना राज्य सरकार आणि महिला बालकल्याण विभागाने कोणतीही अंतीम मुदत न ठेवता मुदतवाढ देण्यात आली.

राज्य सरकारचा अध्यादेश 12 जुलै 2013 नुसार, बचतगट पुरवठा करण्यात सक्षम होत नाही तोपर्यंत हा पुरवठा या संस्था करू शकतील, प्रकल्पस्तरावर बचतगटांची निवड झाल्यानंतर तातडीने या संस्थांचा पुरवठा बंद व्हावा. राज्यात आता 314 बचतगट सक्षम झालेत, 64 सक्षम बचतगट कामाच्या प्रतीक्षेत आहेत. असं असूनही याच तीन बड्या संस्थांचा पुरवठा सुरूच आहे.

महिला बालकल्याण विभागाने नव्याने जी निविदा काढली होती, त्यात 314 बचतगटांचा पुरवठाचा ठेका संपेल त्यांच वेळी ते काम आपोआप नव्या संस्थांकडे वर्ग होईल. याच नियमाच्या धर्तीवर जुन्या ठेकेदारांचा संपलेला ठेका संपलेला सक्षम बचतगटांकडे वर्ग करण्याची भूमिका महिला बालकल्याण विभाग का घेत नाही. हा सवाल आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा