मुलासमोरच ‘गोल्डमॅन’ची 10 ते 12 जणांनी केली निर्घृण हत्या

July 15, 2016 8:12 PM0 commentsViews:

गोविंद वाकडे, पुणे 15 जुलै : पिंपरी चिंचवडचा गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या दत्ता फुगे यांची काल रात्री उशीरा हत्या करण्यात आली. या घटनेनं संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. फुगेच्या हत्येमागे काय गूढ आहे पाहुया..

नाव – दत्तात्रय ज्ञानोबा फुगे
वय – 45 वर्ष
व्यवसाय चिटफंड,जमीन खरेदी-विक्री
ओळख गोल्डमॅन
कारण – 3 किलोपेक्षा जास्त वजनाचा सोन्याचा शर्ट
आणि 2 किलो इतर सोन्याचे दागिने घालणारा
दखल – लिम्का बुकमध्ये गोल्डमॅन म्हणून नोंद

gold_man_dattaसोन्याचा शर्ट शिवल्यानं जागतिक स्तरावर दत्ता फुगेंचं नाव चर्चेत आलं. आज पुन्हा चर्चा झाली ती त्यांच्या निर्घृणपणे झालेल्या खुनामुळे ..अंगावर काटा उभा राहतो..जेव्हा दत्ता फुगेच्या खूनाचं वर्णन ऐकताना… रक्ताचा थारोळा,कोयते आणि रक्तानं माखलेले मोठं मोठाले दगड… ही दृश्य सारं चित्र स्पष्ट करतायेत की, कशापद्धतीनं दत्ता फुगेची हत्या करण्यात आलीये. भोसरीमध्ये 15 ते 18 जणांनी फुगेंची निर्घृणपणे हत्या केली. या खुनाचा थरार दत्ता फुगे यांच्या मुलाच्या डोळ्यादेखत घडला.

शुभमच्या वडिलांवर कोयत्यानं , दगडानं वार होत होते. आणि शुभम बघण्याखेरीज काहीच करू शकला नाही. आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. पण दत्ता फुगे यांचा खून हा नियोजित कट असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

पैशांची अफरातफर आणि त्यातून झालेला वाद हे दत्ता फुगेच्या खूनाला कारणीभूत असेलही पण खोटी प्रतिष्ठा आणि त्यासाठी गैरव्यवहाराच्या जाळ्यात गुंतत जाणं. एखाद्याच्या जीवावर कसं बेतू शकतं, त्याचं उदाहरण म्हणजे हे दत्ता फुगे खून प्रकरण…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा