तुर्कीमध्ये लष्कराचा उठाव फसला, 90 ठार

July 16, 2016 1:24 PM0 commentsViews:

16 जुलै : तुर्कस्तानमध्ये लष्करी उठावाचा प्रयत्न झाला, पण सुदैवानं तो फसला. इस्तंबूल आणि राजधानी अंकारामध्ये लष्करानं स्फोटही घडवले. या सर्व गदारोळात एकूण 90 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, आणि एक हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय.Turkey stand against coup attempt

शुक्रवारी मध्यरात्री तुर्कीच्या बंडखोर सेनेनं सत्ता उलथवून लावण्यासाठी संसदेवर हल्लाबोल केला. इस्तंबूलमध्ये लष्कराने विमानतळ, संसद भवन आणि शासकीय इमारतींचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. अंकारामध्ये तर रस्त्यावर रणगाडे उतरलेत पोलीस आणि लष्करामध्ये अनेक ठिकाणी चकमक सुरू आहे. या उठावाविरोधात नागरिकही रस्त्यावर उतरले.

लष्कराच्या बंडखोर सैन्यानं लढाऊ विमानाचा ताबा घेऊन अंदाधुंद गोळीबार केला. यात 60 जणांचा मृत्यू झाला. या सैनिकांनी पोलीस मुख्यालयावरही हल्ला केला यात 17 जण ठार झाले. तुर्कीच्या स्टेट मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, बंडखोर 754 सैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

लष्कराच्या काही अधिकार्‍यांनी हे कारस्थान रचलंय पण हा उठाव फसला आहे अशी माहिती तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगेन यांनी दिली. देशात वाढती हुकुमशाही आणि दहशतवाद, यामुळे आम्ही उठाव केलाय, असा दावा लष्करानं केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा