आता निवडणुका झाल्या तर सरकार शिवसेनेचंच -उद्धव ठाकरे

July 16, 2016 3:44 PM2 commentsViews:

uddhav_in_ekviraमुंबई, 16 जुलै : आता निवडणुका झाल्या तर सरकार शिवसेनेचंच येईल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय. मुंबईतल्या भांडुुपमध्ये भवानी सहकारी बँकेच्या शाखेच्या उद्घाटनात ते बोलत होते.

यावेळी काही मनसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. बँकेच्या व्याजदरांचा संदर्भ देत त्यांनी आज सगळीकडेच अस्थिरता असल्याचा टोला सरकारला लगावला. आमची बँक वोट बँक असून बाळासाहेबांच्या विचारांचं डिपॉझिट पक्कं असल्याचं सांगत आत्ता निवडणुका झाल्या तर शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असंही त्यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • VINOD

    aanad aahe sarkaar shivseneche aale tar…..asa shakya aahe tar twarit pathimbha kadun ghya aani houdyaat nivadnukaa!

  • Hanumant Choundkar

    Best of luck