नाशिकच्या व्यापार्‍यांचा आडमुठेपणा कायम, ‘परवानेवापसी’ सुरू

July 16, 2016 4:23 PM0 commentsViews:

apmc32323नाशिक, 16 जुलै : मुंबईनंतर नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्यांमध्ये व्यापारी आणि आडतदारांचं आडमुठेपणाचं धोरण कायम आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी व्यापार्‍यांनी ‘परवानेवापसी’ सुरू केली आहे.

जिल्ह्यातील कळवण, लासलगाव, मनमाड, चांदगाव, येवला, चांदगावमधल्या आडत व्यापार्‍यांनी परवाने परत करण्याचं शस्त्रं उगारलंय. आधीप्रमाणेच व्यवहार होऊ द्या, नाही तर हे परवाने ठेवून घ्या अशी भूमिका ह्या आडत व्यापार्‍यांनी घेतली आहे. पण ह्याच व्यापार्‍यांना दुसर्‍या बाजूनं नफाही सुटताना दिसत नाहीये. कारण कांद्याची खरेदी बाजारसमितीबाहेर करण्याची मात्र तयारी आहे. काही दिवसांपूर्वी सरकारनं भाजीपाला, फळविक्री ही नियंत्रणमुक्त केलीय. त्यावर मुंबई, नाशिकमधल्या व्यापार्‍यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा