बेस्ट फाईव्हचा पुनर्विचार करा

April 7, 2010 12:01 PM0 commentsViews: 1

7 एप्रिल बेस्ट ऑफ फाईव्ह संदर्भात सरकारने पुनर्विचार करावा, असे निर्देश विधानसभेच्या अध्यक्षांनी दिले आहेत. अकरावी प्रवेशासंदर्भात गेली तीन वर्षे होणार्‍या गोंधळाचा मुद्दा आज विरोधकांनी अधिवेशनात उपस्थित केला. गेली तीन वर्ष पर्सेंटाईल, नव्वद दहाचा कोटा आणि आता बेस्ट फाईव्हच्या फॉर्म्युल्यानुसार अकरावी प्रवेशाचा जो गोंधळ उडतो त्याकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही, असा आरोप आज विरोधकांनी विधानसभेत केला. ऐन वेळेला सरकारी यंत्रणा कोलमडून पडल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बेस्ट फाईव्हसोबत आणखी एक पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर अध्यक्षांनी बेस्ट फाईव्हवर सरकारने पुनर्विचार करावा असे निर्देश दिले.

close