लोकलसमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या, आत्महत्येचा थरार सीसीटीव्हीत

July 16, 2016 6:25 PM0 commentsViews:

मुंबई, 16 जुलै : मुंबईमधल्या लोकलवर अपघातांची संख्या वाढतेय. मात्र आता काही जण लोकलसमोरच येऊन आपलं जीवन संपवत असल्याचं समोर आलंय. 10 जुलैला चर्चगेटच्या दिशेन जाणार्‍या ट्रेनसमोर येऊन एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना घडलीये. आत्महत्येचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. local_suside

भाईंदर रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी 6 वाजता हा प्रकार घडलाय. एक तरुण लोकलची वाट पाहता होता. जेव्हा ही लोकल प्लॅटफॉर्मच्या जवळ आली लगेच या तरुणाने ट्रॅकवर उडी घेऊन ट्रॅकवर झोपला. काही कळण्याच्या आता या तरुणाचे दोन तुकडे झाले. 2016 मध्ये जवळपास 40 लोकांनी रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केल्याचं समोर आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा