गोल्डमॅन दत्ता फुगेच्या 9 मारेकर्‍यांना 21 जुलैपर्यंत कोठडी

July 16, 2016 5:36 PM0 commentsViews:

goldman_datarya_fugeपुणे, 16 जुलै : पिंपरी चिंचवडचा गोल्डमॅन दत्ता फुगेच्या हत्येप्रकरणी आज 9 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. या 9 आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. तर 4 फरार मारेकर्‍यांचा शोध सुरू आहे.

दत्ता फुगेची गुरुवारी मध्यरात्री दगडानं ठेचून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांना अटक केली होती. पोलिसांनी आरोपीना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर केलं.

कोर्टाने त्यांना 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये. चार आरोपी अजूनही फरार आहेत. चिटफंड घोटाळ्यातून दत्ता फुगेची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा