गजानन पाटील लाचखोरीप्रकरणी खडसेंना क्लीन चिट

July 16, 2016 6:50 PM0 commentsViews:

16 जुलै : गजानन पाटील लाचखोरी प्रकरणात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंना क्लीन चिट देण्यात आलीये. एसीबीनं मुंबई सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल केलं. या आरोपपत्रात एकनाथ खडसेंना उल्लेख नाही. त्यामुळे एकप्रकारे एकनाथ ख़डसेंना ही क्लीन चिट देण्यात आलीये.

khadse333माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा पीए असल्याचं सांगून गजाजन पाटील यानं गायरान जमीन एका संस्थेच्या नावावर करण्यासाठी 30 कोटींची लाच मागितली होती. या प्रकरणी एसीबीनं त्याला अटक केली होती. गजानन पाटलानं ही लाच एकनाथ खडसेंसाठी घेतल्याचा आरोप संस्थाचालकानं केला होता. आता एसीबीनं ख़डसेंना क्लीन चिट दिलीये. एकनाथ खडसेंसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनी गजानन पाटील हा आपल्याचं मतदारसंघाचा आहे, पण तो काही माझा पीए नाही असं स्पष्ट केलं. या प्रकरणी भाजपने ही खडसेंचा या प्रकरणाशी संबंध नाही असं जाहीर करत पाठराखण केलीय.

काय आहे गजानन पाटील कनेक्शन ?

- गजानन पाटीलनं एका संस्थेला लाच मागितली
– ठाणे जिल्ह्यातली जमीन मिळवून देण्यासाठी मागितली लाच
– उद्योजक रमेश जाधव यांना 30 कोटीची मागितली लाच
– रमेश जाधव आणि गजानन पाटील यांच्यामधला संवाद एसीबीनं रेकॉर्ड केला
– रमेश जाधव यांच्या तक्रारीनंतर गजानन पाटीलला एसीबीने अटक केली
– पाटीलनं खडसेंचं शासकीय निवासस्थान आणि कार्यालयाचा वापर केला – एसीबी
– लोकायुक्तांच्या चौकशीत खडसेंना क्लीन चिट
– एसीबीनं दाखल केलेल्या आरोपपत्रातही खडसेंचं नाव नाही


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा