पुणे स्फोटाचा रिपोर्ट सादर

April 7, 2010 1:00 PM0 commentsViews: 1

7 एप्रिल महाराष्ट्र एटीएसने पुणे बॉम्बस्फोटाचा रिपोर्ट सादर केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे हा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.या प्रकरणाचे महत्त्वाचे धागेदोरे दोन दिवसात हाती लागतील, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्रालयाने व्यक्त केली आहे. 13 फेब्रुवारीला पुण्यात जर्मन बेकरीत स्फोट झाला होता. यात 17 जण मृत्यूमुखी तर 60 हून अधिक लोक जखमी झाले होते. स्फोट होऊन एवढे दिवस उलटले तरी तपासात काहीही प्रगती होत नसल्याने पोलिसांवर टीका होत होती.तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. त्यावर तपास दुसर्‍या यंत्रणेकडे सोपवण्याचे संकेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले होते.

close