प्लॉस्टिकच्या पिशव्या घेत आहे विठ्ठलाच्या गायींचा बळी !

July 16, 2016 9:55 PM0 commentsViews:

pandhar_pur_gaiपंढरपूर,16 जुलै : विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील आणखी एका गायीचा प्लॉस्टिकचा कचरा खाल्यामुळे मृत्यू झालाय. आतापर्यंत 25 गायींचा मृत्यू झालाय. आज ज्या गायीचा मृत्यू झालाय. तिच्या पोटातून तब्बल 10 किलो प्लॉस्टिकचा कचरा निघालाय. मंदिरात भक्तांनी पांडुरंगाला अर्पण केलेले निर्माल्य प्लास्टिक पिशव्यांसह गोशाळेत टाकण्यात येत होतं. त्यातलं प्लास्टिक आणि दोरा खाल्यामुळे गायींना बाधा झाल्याचं सांगण्यात येतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा