कर्जत बलात्कार हत्येप्रकरणी ३ नराधम अटकेत, आरोपींवर अंडीफेक

July 17, 2016 7:57 PM0 commentsViews:

98arrest17 जुलै : अहमदनगरमधील कर्जत अल्पवयीन मुलीवरील बलात्का आणि हत्येप्रकरणी तिसरा आरोपीला अटक करण्यात आलंय. नितीन भैलुमेला पुण्यातून पहाटे अटक करण्यात आलीये. आरोपींना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. आरोपींना कोर्टात नेत असतांना जमावाने अंडीफेक केली.

अहमदनगर जिल्ह्यातल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना न्यायालयातून नेत असताना संतप्त जमावानं नराधमांवर अंडी फेकली. दोन नराधमांना आज नगरच्या कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्ट परिसरात जमलेल्या संतप्त जमावानं आरोपींवर अंडी फेकली. पोलिसांनी आरोपींना तातडीनं गाडीत बसवलं. या प्रकरणात आतापर्यंत एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे. नितीन भैलुमे असं अटक केलेल्या तिस­या आरोपीचं नाव आहे. आज पहाटे त्याला पुण्याहून अटक करण्यात आली. य्यापूर्वी जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या दोन आरोपींना अटक करण्यात आलीये. यापैकी दोन आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा