“तुमच्या मुलीवर बलात्कार झाला असता तर…”

July 17, 2016 8:33 PM0 commentsViews:

nagar_252317 जुलै : अहमदनगरच्या कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपींवर कारवाईसाठी गावकर्‍यांना रस्त्यावर उतरावं लागलं. जमावाच्या संतापाला नेत्यांना सामोरं जावं लागलं. “तुमच्या मुलीवर बलात्कार झाला असता तर…”असा संतप्त सवालच मृत मुलीच्या नातेवाईकांनी नेत्यांना विचारला. या प्रकरणी तिघांनाही अटक झालीये. आणि कोर्टातही हजर करण्यात आलं. पण या प्रकरणानं संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसलाय.

“तुमच्या मुलीवर बलात्कार झाला असता तर…काय केलं असतं” कर्जतच्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आधी किती निष्काळजीपणा दाखवला त्यावर उमटलेली ही प्रतिक्रिया… आरोपींची ओळख पटल्यानंतरही पोलीस त्यांना अटक करत नव्हते. शेवटी या मुलीच्या नातेवाईकांना रस्त्यावर उतरावं लागलं, त्यानंतर सुस्त पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि उरलेल्या आरोपींच्या मुसक्या बांधल्या.

लोकांचा संताप एवढा होता की, त्याचा कोणत्याही क्षणी उद्रेक होईल अशी स्थिती होती. परिस्थिती पाहून राम शिंदे यांनीही आंदोलनाच्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. तर पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्दयपणे हत्या करण्यात येते. त्या नराधमांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांना आंदोलन करावं लागतंय. आणि मग यंत्रणांना जाग येते. ही बाब खरंच लाजीरवाणी आहे. मुख्यमंत्री साहेब या राज्यात असंच चालत राहणार आहे का ?, राज्यातल्या आया बहिणींना न्यायासाठी असंच रस्त्यावर उतरावं लागणाराहे का ? या उत्तर तुम्हालाच द्यावं लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा