भूत काढण्याच्या बहाण्यानं महिला मांत्रिकाची चिमुरडीला जबर मारहाण

July 17, 2016 8:46 PM0 commentsViews:

police train black magice

17 जुलै : औरंगाबादमध्ये अंगातलं भूत काढण्याच्या बहाण्यानं एका अल्पवयीन मुलींला जबर मारहाण करण्यात आलीय. सुनीता जाधव असं मारहाण करण्यार्‍या महिलेचं नाव आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुनीता जाधव या मुलीला मारहाण करत होती, तिच्याकडून स्वतःच्या घरातलं काम करून घेत होती. या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे, तिच्या विरोधात अंधश्रदा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

या मुलीच्या अंगात कुठले भूत आहे, अशी शंका या मुलीच्या आईला येत होती. त्यामुळे ती या मुलीला सुनीता जाधवकडे घेऊन आली होती. गेल्या 3 वर्षांपासून सुनीता जाधवनं या मुलीचा अतोनात छळ केला. कधी लाटण्यानं तर कधी लोखंडी सळईनं ती मारहाण करत होती, असं या मुलीनं सांगितलंय. त्यानंतर काही जणांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली. या लहानगीचा छळ करणार्‍या सुनीता जाधवविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी होतेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा