खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार -मुख्यमंत्री

July 17, 2016 9:34 PM0 commentsViews:

 

CM Deven17 जुलै : कर्जत अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी जनता रस्त्यावर आल्यानंतर चार दिवसांनंतर राज्य सरकारला जाग आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेली घटना अत्यंत निदंनिय असं सांगत खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची घोषणा केली. तसंच विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

अहमदनगर जिल्ह्यात कर्जतमधल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आज 5 वा दिवस आहे. आतापर्यंत एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे. नितीन भैलुमे असं अटक केलेल्या तिसर्‍या आरोपीचं नाव आहे. आज पहाटे त्याला पुण्याहून अटक करण्यात आली. यापूर्वी जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या दोन आरोपींना अटक करण्यात आलीये. यापैकी दोन आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलंय. त्यांना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी नगरकर रस्त्यावर उतरले आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी कर्जतमध्ये जाऊन निर्भयाच्या नातेवाईकांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं जाहीर केलं. या खटल्यासाठी सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी विनंती करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याचबरोबर राम शिंदे यांच्यासोबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोतील व्यक्ती हा आरोपी नाही हे फोटोनिशी असा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा