‘त्या’ फोटोतली व्यक्ती आरोपी नाही, राम शिंदेंची माफी मागा-मुख्यमंत्री

July 17, 2016 10:18 PM0 commentsViews:

CM in UArangabad17 जुलै : कर्जत अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणातला आरोपी राम शिंदेंसोबत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण त्या फोटोतील व्यक्ती ही आरोप नव्हती तर राम शिंदेंचा कार्यकर्ता होता असा पुराव्यानिशी खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसंच ज्यांनी हा खोडसाळपणा केला आहे त्यांनी आता जाहीर माफी मागावी असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं.

कर्जत प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. याचा प्रकरणात एक आरोपी हा नगरचे पालकमंत्री राम शिंदेंसोबत असल्याचा एक फोटो सोशलमीडियावर व्हायरल झाला. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी या फोटोवरुन राम शिंदेंवर टीका केली आणि राजीनाम्याची मागणी केली. संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन राम शिंदेंची बाजू मांडली. मुख्यमंत्र्यांनी आरोपी आणि त्या व्यक्तीचा फोटो पत्रकार परिषद दाखवला आणि हा खोडसाळपणा आहे. दोघांच्या नावामुळे हा घोळ झालाय. राम शिंदेंनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केलीये. आरोप करण्याच्या आधी खातरजमा करून आरोप करावे, झालेल्या प्रकारबद्दल राम शिंदेंची जाहीर माफी मागावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर धनंजय मुंडेंनी ट्विट करून झालेल्या प्रकारबद्दल दिलगिरी व्यक्त केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा