कर्जत ‘निर्भया’ प्रकरणावर उद्या अधिवेशनात चर्चा

July 18, 2016 1:24 PM0 commentsViews:

मुंबई, 18 जुलै : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नगरमधील कोपर्डीच्या बलात्कार आणि खून प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. या मुद्यावर स्थगन प्रस्ताव विरोधकांनी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फेटाळण्यात आला. मागणी फेटाळल्यानं विरोधक आक्रमक झाले. नारायण राणे आणि धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावावर चर्चा व्हावीच असा आग्रह धरला. विरोधकांच्या आक्रमक पवित्रा पाहून कलम 97 नुसार उद्या चर्चा घेण्याचं मान्य करण्यात आलं.vidhan bhavan3

कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणावर विधान परिषदेत उद्या चर्चा होणार आहे. विरोधकांनी विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली. अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी सरकारला या प्रश्नी चांगलंच धारेवर धरलं. यावरुन मुख्यमंत्री आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात ख़डाजंगी झाली. विधानसभेत परतलेले नारायण राणे यांनी आपल्या अनुभवाचा हिसका दाखवत भाजप भाजप आमदारांची बोलती बंद केली. नारायण राणे यांनी कलम 97 नुसार चर्चा घेता येते हे सभापतींच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर यावर चर्चा घेण्यास सभापतींनी तयारी दर्शवली. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर निवदेन करताना पीडित कुटुंबाला आठ लाख रुपयांची सरकारी मदत जाहीर केली. शिवाय पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण दिल्याचंही त्यांनी सांगितलं. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच शिवाय उज्ज्वल निकम हा खटला लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा