‘निर्भया’ला न्याय द्या, राज्यभर उसळला जनक्षोभ

July 18, 2016 1:52 PM0 commentsViews:

18 जुलै : कोपर्डीमधल्या बलात्कार आणि खून प्रकरणाचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटत आहेत. आज अनेक ठिकाणी बंद आणि निषेध मोर्चांचं आयोजन करण्यात आलंय. अहमदनगर, बीड, अंबाजोगाई, हिंगोली, मराठवाड्यात निर्भयाला न्याय द्या मागणीसाठी हजारो लोकं रस्त्यावर उतरली आहे. दोषींना कठोर शिक्षा द्या अशी एकच मागणी सर्व स्तरातून होत आहे. मात्र, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागेल. हिंगोली येथे शासकीय विश्रामगृह समोर एसटी बस फोडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.karjat_rape_case_

बंद, मोर्चे आणि निदर्शनं

अहमदनगरमध्ये आज ठिकठिकाणी बंद, मोर्चे आणि निदर्शनं होताना दिसत आहे. अकोले शहरात आज सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आलीय. अकोल्यात 100 टक्के बंद पाळून लोकांनी या घटनेचा निषेध केलाय .तर नेवासे आणि राहाता या शहरांमध्येही निषेध मोर्चे आणि सभा घेण्यात आल्या. घारगाव इथं प्रकरणाच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसंच या घटनेविरोधात शहरात मोर्चाचंही आयोजन करण्यात आलं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध केला आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिलं.

एसटीची जाळपोळ

कर्जत सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या निषेधात पडसाद सगळीकडे उमटायला लागलेय. काल रात्री हिंगोलीतल्या शासकीय विश्रामगृहासमोरील एका एसटी बसची जाळपोळ करण्यात आली. सुदैवाने एसटीमध्ये फक्त दोन प्रवासी असल्याने या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही. तर दुसर्‍या घटनेत हिंगोली तालुक्यातील सावरखेडा येथे रात्री 10.30 च्या सुमारास एसटी मध्ये असलेले 8-9 प्रवासी उतरवरून बसच्या काचा फोडूननंतर ती जाळण्यात आली. एसटीमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी हिंगोली येथून बंब मागवून आग विझवण्यात आली. मराठा शिवसैनिक सेनेने या घटनेची जबाबदारी स्विकारलीये. आज जिल्ह्यात सर्व पक्षीय संघटनानी आंदोलन पुकारल्यामुळे अनेक ठिकाणी बंद करण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

बीडमध्ये कडकडीत बंद

बीड, अंबाजोगाई, नेकनूरसह जिल्ह्यातील इतरही ग्रामीण भागात कर्जत तालुक्यातील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी बंदची हाक दिली होती. या वरून आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. या पार्शभूमीवर संतप्त कार्यकर्त्यानी वडवणी तालुक्यातील मैंदा फाट्याजवळ धारूर कडे जाणार्‍या बसवर दगडफेक केली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाल नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा