संस्थाचालकाची मुजोरी, IBN लोकमतच्या टीमवर हल्ला

July 18, 2016 2:25 PM0 commentsViews:

19 जुलै : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील उकडी येथील अहिल्याबाई होळकर आदिवासी आश्रमशाळेतील गैरव्यवहाराच्या संदर्भात बातमी करण्यास गेलेल्या आयबीएन लोकमतच्या पत्रकारांवर संस्थेच्या संचालकाने हल्ला केल्याची घटना घडलीये. मुजोर संस्थाचालकने आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधी सुरभी शिरपूरकर आणि व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत यांना धक्काबुक्की केली.

nagpur3नेहमी अनेक वादांमध्ये असलेल्या अहिल्यादेवी होळकर आश्रमशाळेतील अनेक गैरप्रकार झाले आहे. पण हे गैरप्रकार उघड होऊ नये म्हणून आश्रमशाळेचे संस्थापक श्रीकृष्ण मते आणि त्याचे सहकार्‍यांनी आयबीएन लोकमतच्या पत्रकारांवर हल्ला केला. यात आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधी सुरभी शिरपुरकर आणि व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत यांना धक्काबुक्की केली. दरम्यान, या संपुर्ण प्रकरणात हिंगणा पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा