नवज्योत सिंग सिद्धूंची भाजपला सोडचिठ्ठी,’आप’मध्ये प्रवेश ?

July 18, 2016 4:53 PM0 commentsViews:

sidhu18 जुलै : माजी क्रिकेटर आणि खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाजपला रामराम ठोकत राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांची पत्नी हे दोघंही आपमध्ये सहभागी होणार आहेत, असं कळतंय. नवज्योत सिंग सिद्धू हे पंजाब विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये पुढच्या वर्षी निवडणूक होणार आहे. नवज्योत सिंग सिद्धू हे आप नेत्यांच्या संपर्कात असून त्यांची आपकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येतेय.

गेल्या काही दिवसांपासून नवज्योत सिंग सिद्धू भाजपमध्ये नाराज होते. कित्येक वेळा त्यांनी आपली नाराजीही बोलून दाखवली होती. एवढंच नाहीतर त्यांच्या पत्नी कौर या ही भाजपमध्ये नाराज होत्या. अनेक पत्रकार परिषदेत त्यांना उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
अखेर आज सिद्धू यांनी भाजपला सोठचिठ्ठी देत आपची वाट निवडली आहे. पंजाबमध्ये पुढच्या वर्षी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर आपला मोठ्या चेहर्‍याची गरज होती. ती आता सिद्धू यांच्याकडून पूर्ण होण्याची रणनिती आखण्यात आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा