‘ती’मुलगी आपल्या घरातील समजून कारवाई करा -अजित पवार

July 18, 2016 6:41 PM2 commentsViews:

मुंबई, 18 जुलै : जे निर्भयाच्या बाबतीत दिल्लीत घडलं त्यापेक्षाही भयंकर कर्जतमधील कोपर्डीमध्ये घडलंय. ती 15 वर्षांची आपल्या घरातली मुलगी आहे हे समजून घ्या आणि यापुढे कुणी आयाबहिणींकडे वाकड्या नजरेनं सुद्धा पाहणार नाही असा कडक कायदा आणा अशी संतप्त मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.ajit_pawar323

कोपर्डी प्रकरणावर आज विधानसभेत पडसाद उमटले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं भाषण लक्ष्यवेधी असंच ठरलं. अजित पवारांनी भाजप सरकारवर टीका तर केलीच पण बलात्कारासारख्या संवदेनशील प्रकरणावर एकत्र येण्याचं आवाहनही केलं. महाराष्ट्रातून 228 आमदार निवडून आलो पण आज शर्म वाटते जे असे प्रकरण घडते. दिल्लीत जेव्हा निर्भया प्रकरण घडले तेव्हा लोकसभेतील सर्व सदस्य एकवटले होते आणि कायदा अस्तित्वात आणला. आपण कायदा करू शकत नाही पण शिफारस तर करू शकतो. अशा संवदेनशील विषयावर जर चर्चा केली नाहीतर लोकांमध्ये काय संदेश जाईल यांचं भान बाळगा असे खडेबोलही अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले. कुणी बलात्कार करू नये असा कडक कायदा केला पाहिजे किंवा त्याबद्दल दहशत निर्माण झाली पाहिजे अशी मागणी पवारांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

 • nilesh

  अरे जे बलात्कार करतील त्यांना असा कायदा करा की जो इराक , इराण ,आणि सौदी अरेबिया, आणि दुबई या देशामध्ये त्या नराधमाला दगडाने किव्हा आसुडाने भर चौकात ,सगळ्यांसमोर ठेचून मारतात अशी शिक्षा दिली तर या देशात बलात्कार कमी होतील . अरे नसेल जमत तर शिवाजी महाराज यांचे कार्य पद्धत वापरा की त्यांनी चौरंगी कलम( म्हणजे हात -पाय कट करून त्याला भर चौकात भीक मागायला लावणे . ) शिक्षा वापरली त्यानंतर कुठे बलात्कार झाले नाही पाहिजे.
  अरे वचक, दरारा बसला पाहिजे असे गुन्हे करायला अस्या नाराधामाची हिम्मत झाली नाही पाहिजे नाहीतर तुम्हांला नसेल जमत तर आम्हाला सांगा आह्मी अशी शिक्षा देऊ की त्याला यमदूत सुद्धा ओळखू शकणार नाही आणि कुन्हाची हिम्मत पण नाही होणार की आई बहिणीकडे बगन्याची ..
  भर चौकात शिक्षा जर दिली गेली तर आणि तरच अश्या घटना कमी होतील …हाच का तो महाराष्ट्र कीं ज्यांनी बलिदान दिली त्यांच्या स्वप्नातला …….अरे आता खूप झाले आता फक्त बघण्याची नाही काहीतरी करून दाखवण्याची वेळ झाली …उठा उठा लोकांनो चांगला महाराष्ट्र घडवण्याची हीच योग्य वेळ आहे. अरे हा महाराष्ट्र नाही की ज्यांनी याच्या साठी खूप नेत्यांनी आपले जीवन बलिदान दिले …..आता आपल्या महाराष्ट्र मध्ये श्वास घ्यायला त्रास होतोय …..आणि जे असे पॉर्न चित्रपट बनवून तरुण पिडीला बिघडण्याचे काम करतात त्याच्यावर कडक कायदे करा …..ये दिवस बघायला आम्ही पूर्ण बहुमताने सरकार निवडून दिले नाही ….आम्हाला बदल हवा होता आणि पुन्हा त्याच घटना घडत असाल तर मग आम्हाला मागच्याच लोकांना निवडून द्याल हवे .
  असे घडणार असेल तर मुलींना सेल्फडिफेन्स साठी बंदूक परवाना द्या त्यामुळे तरी बलात्कार कमी होतील.
  …………….एक वैतागलेला आणि चिडलेला सामान्य नागरिक …………………….