शेट्टी हत्या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करा

April 7, 2010 2:03 PM0 commentsViews: 2

7 एप्रिलपुण्यातील सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने सीबीआयला दिले आहेत. शेट्टी हत्याप्रकरणाचा तपास करण्यासंदर्भात सीबीआयची काय भूमिका आहे, यासंदर्भात हे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. याआधी सतीश शेट्टींचे भाऊ संदीप शेट्टी यांनी हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती.तर राज्य सरकारनेही या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची तयारी दाखवली होती.

close