वरिष्ठांच्या छळामुळे इंजीनिअरची आत्महत्या

April 7, 2010 2:11 PM0 commentsViews: 2

सुधाकर कांबळे, मुंबई7 एप्रिल वरिष्ठ अधिकार्‍यांच्या छळामुळे मुंबई महापालिकेतील एका ज्युनिअर इंजीनिअरने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. नंदकिशोर गाडेकर या तरुण इंजानिअरने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. पण महापालिका अधिकार्‍यांनी हा आरोप फेटाळला आहे. गाडेकर याने वैयक्तिक कारणामुळे आलेल्या निराशेतून आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला आहे. गेल्या साडेचार वर्षापासून ज्युनिअर इंजीनिअर म्हणून महापालिकेच्या सेवेत असलेल्या गाडेकर यांना प्रमोशन मिळाले होते. पण त्यांना प्रमोशन देण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाच लाखांची लाच मागितल्याचा आरोप गाडेकरांच्या वडिलांनी केला आहे.गाडेकर यांना क्रिकेटची आवड होती आणि डकवर्थ लुईस या नियमापेक्षा त्यांनी चांगल्या नियमांचा शोध लावला होता. आणि त्याबाबतचे प्रेझेंटशनही त्यांनी बीसीसीआयच्या अधिकार्‍यांसमोर केले होते. पण त्यांचे नियम स्वीकारले गेले नाहीत म्हणून निराश होऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा पालिकेचे अधिकारी करत आहेत. पण त्यांचा दावा खोटा असल्याचे बीसीसीआयच्या अधिकार्‍यांनीच स्पष्ट केले आहे.एकंदरीतच गाडेकर यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी आता या प्रकरणी पोलिसांनी नव्याने चौकशी करण्याची मागणी गाडेकर कुटुंबीयांनी केली आहे.

close