गोल्डमॅन दत्ता फुगेचा सोन्याचा शर्ट रांका ज्वेलर्सकडे !

July 18, 2016 9:18 PM0 commentsViews:

18 जुलै : ज्या शर्टमुळे दत्ता फुगेला गोल्डमॅन म्हणून ओळख मिळाली तो कोट्यावधी रुपयाचा शर्ट गायब झाल्याची बाबसमोर आली आहे. पण तो शर्ट रांका ज्वेलर्सकडे सुरक्षीत असल्याचा दावा दत्ता फुगेचा मुलाने केलाय.

goldman_datarya_fugeगेल्या आठवड्यात दिघीमध्ये दगडाने ठेचून खून करण्यात आलेल्या गोल्डमॅनन दत्तात्रय फुगे यांच्या सोन्याच्या शर्टावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. हा शर्ट गायब झाल्याची चर्चा सुरू असतानाच फुगेंचा मुलगा शुभम याने तो शर्ट रांका ज्वेलर्सकडे असल्याचा दावा केला. वडिलांनीच तो शर्ट रांका ज्वेलर्सकडे ठेवला, असं  दत्ता फुगेचा मुलगा शुभम फुगेनं सांगितलंय.  तसंच रांका ज्वेलर्स यांच्याकडे दत्ता फुगे यांचा शर्ट ठेवण्यात आला होता. त्याबाबतचे कागदपत्रे इन्कम टॅक्स विभागाकडे आहेत असा दावा फुगे यांच्या कुटुंबियांनी केलाय.

दत्ता फुगेने सुरक्षेच्या कारणास्तव हा शर्ट रांका ज्वेलर्सकडे ठेवला खरा पण त्याबदल्यात व्याजाने पैसे घेतले होते. तुर्तास तरी हा शर्ट रांका ज्वेलर्सकडे असल्याचा दावा फुगे कुटुंबियांनी केलाय. पण, याबद्दल रांका ज्वेलर्सने कोणतीही माहिती दिली नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा