…तर मीही त्याला मारलं असतं -नाना पाटेकर

July 18, 2016 9:54 PM0 commentsViews:

18 जुलै : मुलीने प्रतिकार करणे हे साहजिकच आहे. पण, जिथे ही घटना घडत आहे तिथून जाणार्‍यांनी बचावासाठी पुढं आलं पाहिजे. उद्या माझ्यावर जर हल्ला झाला कर मी स्वरक्षणासाठी त्याला मारलं असतं अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी कोपर्डी प्रकरणावर दिली.nana_patekar

अहमदनगरमधल्या कोपर्डी बलात्कार-खून प्रकरणावर अभिनेते नाना पाटेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. घटनेला प्रत्येकानं प्रतिकार करावा आणि स्वसंरक्षणार्थ हत्यार उचलावं, असं नाना पाटेकर यांनी म्हटलंय. प्रतिकार करताना खून झाला तरी ती हत्या नाही ,कायद्यानुसार स्वरक्षणासाठी उचलेलं पाऊल हे माफ केलं जात असतं. कुठेही अशा प्रकारची घटना घडत असेल तर नुसती बघ्याची भूमिका न घेता पुढे या आणि मदत करा असं आवाहनही नानांनी केलं. तसंच कोपर्डीमध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या ठिकाणी मी असतो तर स्वरक्षणासाठी मीही त्याला मारलं असतं असंही नाना पाटेकर म्हणाले. अशा प्रकरणाना जातीय रंग देणं चूक आहे. आपली जात भारतीय असली पाहिजे, असंही ते म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा