कुणी वाकड्या नजरेनं पाहणार नाही असा जरब बसवा-अजित पवार

July 19, 2016 2:02 PM0 commentsViews:

ajit_pawar323मुंबई, 19 जुलै : कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद आजही पावसाळी अधिवेशनात उमटले. राज्यातल्या आया-बहिणीकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहणार नाही अशी जरब बसवणार्‍या शिक्षेची तरतूद करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. तर विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केलीये.

कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणाची वादळी चर्चा झाली. या चर्चेत अजित पवारांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि थेट मंत्रालयापर्यंत महिला सुरक्षित नाहीत. कायदा एवढा कठोर करा की सरकारला पीडित महिलेला मदत करण्याची वेळ येऊ नये परखड मतही अजित पवारांनी व्यक्त केलं. तर मुख्यमंत्री आपलं अपयश लपवून ठेवण्यासाठी कोपर्डी प्रकरणावर चर्चा करण्यासाठी चालढकल करीत होते असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा