मुख्यमंत्री कोपर्डीत का गेले नाही ? -धनंजय मुंडे

July 19, 2016 4:34 PM0 commentsViews:

dhanjay_munde3422323मुंबई, 19 जुलै : कोपर्डीत एका शेतकर्‍याच्या मुलीवर बलात्कार झाला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डीला जाऊन त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन का केलं नाही असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुं़डे यांनी उपस्थित केलाय.

विधान परिषदेत कोपर्डी प्रकरणावर चर्चा करताना सरकारच्या कारभाराची लक्तरंचं काढली. मुख्यमंत्री आषाढीच्या पुजेनंतर कोपर्डीला जाऊ शकले असते पण त्यांनी तसं न करता मातोश्रीवर मेजवानी झोडली. राम शिंदेंना कोपर्डीत जाण्यासाठी 48 तास का लागले असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरपासून मंत्रालयापर्यंत कुठंच महिला सुरक्षित नसल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा