…आता ‘निर्भया’ प्रकरणाचा गुन्हा मुख्यमंत्र्यांवर दाखल करावा का?- राणेंचा घणाघात

July 19, 2016 6:51 PM1 commentViews:

19 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा आमदार होते तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री विलास देशमुख यांच्यावर राज्याच्या सुरक्षेच्या बोजवारा उडाल्याचा आरोप करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती आता कोपर्डीमध्ये निर्भया प्रकरणाचा गुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर दाखल करावा की नाही हे त्यांनीच सांगावे असा घणाघात काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केला. तसंच
कोपर्डी हे पाकिस्तानच्या पलिकडे आहे का ? जिथे मुख्यमंत्र्यांना जाता आलं नाही असा सवालही राणेंनी उपस्थिती केला.

rane_vs_cmकोपर्डी प्रकरणावर आज विधानसभेत वादळी चर्चा झाली. विरोधकांनी सत्ताधारी भाजप सरकार धारेवर धरत चांगलीच टीका केली. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडेबोल सुनावत चांगलंच फैलावर घेतलं. कोपर्डीमध्ये घडलेल्या गंभीर प्रकरणाचं राज्य सरकारला गांभिर्य नाही. उलट राज्य सरकारने स्वत:पुढाकार घेऊन चर्चा केली पाहिजे होती. पण, असं काही घडलं नाही. नववीच्या वर्गात शिकणार्‍या चिमुरडीवर अमानुष अत्याचार होता. बोलता येणार नाही असा अत्याचार या चिमुरडीवर करण्यात आला. याबद्दल मुख्यमंत्र्यांना काहीच कसं वाटतं नाही. मुख्यमंत्री विठ्ठलाला साकडं घालू शकता, मातोश्रीवर जाऊन मेजवानीचा आनंद घेऊ शकता, दिल्लीला जाऊ शकता पण नगरमध्ये जाऊ शकत नाही ?, नगर काय पाकिस्तानच्या पलीकडे आहे का ? असा संतप्त सवाल नारायण राणे यांनी उपस्थिती केला.

आता तुमच्या गुन्हा दाखल करावा का?

ज्या मुख्यमंत्र्यांकडे कायदा आणि सुव्यवस्था आहे. ते मुख्यमंत्री जेव्हा आमदार होते तेव्हा विलासराव देशमुख यांना म्हणाले होते. या राज्यात बलात्कार होत आहे. खून होत आहे. आत्महत्या होत आहे. याला जबाबदार मुख्यमंत्री आहे. त्यांच्या बेजाबदारपणामुळे राज्यात अशा घटना घडत आहे. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी तेव्हा फडणवीस यांनी केली होती. आता मला सांगा तुम्ही आता राज्याचे मुख्यमंत्री आहात मग तुमच्यावर नगरच्या कोपर्डी प्रकरणाचा गुन्हा दाखल करावा का ? याचं तुम्हीच द्या असं म्हणत राणे यांनी फडणवीसांना आठवण करून दिली. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यस्थेचा बोजवारा उडालाय. याला जबाबदार देवेंद्र फडणवीसच आहे. कारण, त्यांना गृहखाते कळलेच नाही असा टोलाही राणेंनी लगावला.

तो मंत्री कोण ?

तसंच महाराष्ट्रात सर्वात जास्त गुंड असेल तर ते भाजपमध्ये आहे. मग सन्मानिय मुख्यमंत्री कशाच्या आधारावर राज्याच्या जनतेला आधार देणार ? नागपूर ते मुंबई कोणताही जिल्हा घ्या, प्रत्येक जिल्ह्यात एक यादीच तयार होईल. एवढंच नाहीतर एक क्लास वन अधिकारी कॅबिनेट मंत्र्यांकडे जाते. त्या मंत्र्यांची भेट घेऊन आल्यावर तक्रार करते की, या मंत्र्यांकडे परत जाणार नाही. तुम्ही यांचा बंदोबस्त करा. जिथे मंत्रीच असे वागत असतील तर गुंड का अत्याचार करणार नाही असा घणाघात ही राणे यांनी केला. राणेंच्या या आरोपांमुळे भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण राणेंनी त्या मंत्र्यांचे नाव सांगू का असं म्हणताच भाजपच्या सदस्यांनी तलवार म्यान केले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • VINOD

    NIRBHAYA PRAKARAN KHUPACH GAMBHIR AAHE TYAVAR KAAY TOH LAVKRAAT LAVKAR NIRNAY GHYA AANI BHAR RASTYAT PHASHI DYA………………AANI LAGECH JANATECHYA PRASHNANVAR CHARCHA SURU KARA…………HI VINANTI………………MHAGAI VAR LAKSH DYA SHETAKRI PRASHANVAR LAKSH DYA……..ATMHATYA KAA HOT AAHET HE BAGHA….!