आंबेडकर भवन पाडण्याच्या निषेधार्थ विराट मोर्चा

July 19, 2016 8:03 PM0 commentsViews:

cst_march3मुंबई, 19 जुलै : आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ आज (मंगळवारी) सर्वपक्षीय असा विराट मोर्चा काढण्यात आलाय. भायखळ्यावरून निघालेला हा मोर्चा आझाद मैदानात पोहचल्यानंतर त्याचं भव्य सभेत रुपांतर झालं. भर पावसात 30 हजाराहून अधिक आंदोलक आंदोलनात सहभागी झाले होते.

दादर पश्चिममध्ये मध्यरात्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन पाडण्यात आलं होतं. याच्या निषेधार्थ आज मुंबईत भायखळा ते सीएसटी भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी या कृत्याला जबाबदार असलेले रत्नाकर गायकवाड यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. रत्नाकर गायकवाड यांना अटक केली नाहीतर राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. या मोर्च्यात लोकांची संख्या जास्त असल्याने आझाद मैदानाबाहेर काहीजण उभे होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. या मोर्च्यात प्रकाश आंबेडकर, सेनेच्या नेत्या निलम गोर्‍हे आणि कन्हैय्या कुमार आदी उपस्थित होते. मुसळधार पावसातही 30 हजारहून अधिक लोकं मोर्चात सहभागी झाले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा