‘अस्सा इगो सुरेख बाई’

April 7, 2010 2:24 PM0 commentsViews: 5

भक्ती पेठकर, ठाणे7 एप्रिल इगो… सगळ्यांच्याच व्यमत्वाचा भाग… या स्वत्वाचे म्हणजेच 'इगो'चे वेगवेगळे पैलू मांडलेत 'अस्सा इगो सुरेख बाई' या नाटकातून… लवकरच हे नाटक तुमच्या भेटीला येत आहे.इगो…हा प्रत्येकाच्या स्वभावात असतो…. आणि तो वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या पध्दतीने आपल्या समोर येत असतो…..आणि याचेच वेगवेगळे पैलू आता एका नाटकातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत.. अस्सा इगो सुरेख बाई हे या नाटकाचे नाव.. माणसांचे इगो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात.. त्यामुळे यातील दिग्दर्शक आणि कॅरेक्टर्सनी हे इगो आपल्यासमोर गोष्टींच्या स्वरूपात मांडलेत.. इगो म्हणजे मनातील द्वंद्व … त्यामुळे तो दोन मित्रांमधला असो, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातला असो किंवा अगदी नवरा बायकोच्या नात्यातला. या नाटकातील कॅरेक्टर्स अशी निरनिराळ्या स्वरूपात आपल्याला भेटतात.वेगळ्या विषयाचे आणि वेगळ्या धाटणीचे हे नाटक हे तरूण रंगकर्मी येत्या 26 एप्रिलला रंगभूमीवर घेऊन येत आहेत आणि तेही मनात कुठलाही इगो न ठेवता…

close