संतापजनक !, बलात्कार पीडित मुलीची सर्वांसमोर नोंदवली साक्ष

July 19, 2016 9:43 PM0 commentsViews:

जळगाव, 19 जुलै : राज्यभरात नगरमधलं कोपर्डी बलात्कार प्रकरण गाजतंय. पण अल्पवयीन मुलींवर बलात्कार थांबलेले नाही. जळगाव शहरातल्या मेहरूण परिसरात एक दहा वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला. त्यानंतर घडलेला प्रकार आणखी संतापजनक होता. महिला आयोगाच्या सदस्य देवयानी ठाकरे यांनी या मुलीला घराबाहेर बोलावून तिला जमलेल्या लोकांसमोर साक्ष नोंदवण्याचा शर्मेचा प्रकार केला.jalgaon444

पीडित मुलीवर तिच्या घराशेजारीच राहणार्‍या रिक्षाचालकाने अत्यंत क्रूरपणे तिच्यावर अत्याचार केलाय. ही मुलगी झोपेत असताना हा नराधम तिच्या घरात शिरला आणि तिचं तोंड दाबून त्यानं बलात्कार केलाय. त्यानंतर राजू निकम फरार झालाय. त्याच्याविरोधात औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. या मुलीवरचे अत्याचार इथंच थांबले नाहीत. तर महिला आयोगाच्या सदस्य देवयानी ठाकरे यांनी या मुलीला घराबाहेर बोलावून तिला जमलेल्या लोकांसमोर प्रश्न विचारले.

अत्यंत असंवेदनशील अशा या कृत्यामुळे संताप व्यक्त होतोय. महिलांच्या न्यायासाठी लढणार्‍या या राज्य महिला आयोगाच्या सदस्यांना एवढंही भान कसं राहिलं नाही. या मुलीची तिच्या घरासमोर लोकांसमोर तिची साक्ष घेण्याऐवढ्या त्या असंवेदनशील कशा झाल्या हाच प्रश्न आहे. कारण या चौकशीचे फोटोही व्हायरल करण्यात आले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा