मुंबई रस्ते घोटाळ्याप्रकरणी 2 अभियंते निलंबित

July 20, 2016 1:33 PM0 commentsViews:

mumbai_road_scamमुंबई, 20 जुलै : मुंबईतल्या रस्ते घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या दोन कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आलंय. विभास आचरेकर आणि किशोर येरमे अशी निलंबित अधिकार्‍यांची नावं आहेत.

रस्ते घोटाळ्यातल्या आरोपी कंत्राटदारांकडून बेकायदेशीरपणे दंड वसूल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या दोघांसोबत चार उपअभियंत्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. रस्त्यांच्या बांधकामात गुन्हे दाखल असलेल्या कंत्राटदारांकडून दंड वसूल केल्यानं ठेकेदारांना कोर्टात अटकपूर्व जामीन मिळवणं सोपं झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा