पानसरे हत्येच्या निषेधार्थ “हिंसा के खिलाफ…’ कोल्हापूरकांची चळवळ

July 20, 2016 1:45 PM0 commentsViews:

कोल्हापूर, 20 जुलै : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज 17 महिने पूर्ण झालेत तरीही मारेकरी मोकाटच आहेत. याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूरमध्ये पुरोगामी संघटनांच्या वतीने मॉर्निंग वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं.

kolhapur_3423कॉ. पानसरेंच्या घरापासून ते कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत हा मॉर्निंग वॉक काढण्यात आला. यावेळी राज्य सरकारचा जाहीर निषेध करत पानसरे, दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या मारेकर्‍यांना कधी पकडलं जाणार असा सवाल विचारण्यात आला.

“हिंसा के खिलाफ और मानवता की और” या नावानं आता कोल्हापूरमध्ये एक चळवळ उभी करण्यात येणार असून राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर दबाव टाकण्याचा निश्चय यावेळी कार्यकर्त्यांनी केलाय. 1 महिना ही चळवळ चालणार असून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहनंही करण्यात आलंय. या वॉकमध्ये पानसरेंच्या सोबत काम केलेल्या आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा